लोकसभेसाठी काँग्रेसकडून पाच जण इच्छुक 

पुणे : पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी मोहन जोशी, अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, अरविंद शिंदे, अनंतराव गाडगीळ यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे शहर कॉंग्रेस ही नावे पुढील आठवड्यात प्रदेश कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत सादर करणार आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पुणे शहराच्या जागेवर दावा केलेला असतानाच पुणे सोडणार नसल्याचे शहर कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण तसेच केंद्रीय नेत्यांकडेही म्हटले आहे. लोकसभा निवडणुका पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पार पडणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रदेश कॉंग्रेसकडून मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार आहे. मुंबई येथे प्रदेश कॉंग्रेसची बैठक 15 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. या बैठकीत मतदारसंघातील पक्षाची बांधणी, कार्यकर्त्यांचे संघटन आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. 

यात उमेदवार कोणताही असो, त्याचे एकीने काम करायचे आणि त्याला निवडून आणण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला. या वेळी मोहन जोशी, अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, अरविंद शिंदे यांनी कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, आमदार अनंत गाडगीळ यांनीही उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यामुळे ही नावे प्रदेश कॉंग्रेसकडे पाठविण्याचा निर्णय शहर कॉंग्रेसने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री सुरेश कलमाडी यांच्या नावाची चर्चा रंगली होती. 

उमेदवार क्‍लबमध्ये कसा ठरतो? 
लोकसभेचा उमेदवार ठरविण्यासाठी शहर कॉंग्रेसने कॉंग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यायला हवा होता. एखाद्या क्‍लबमध्ये चार भिंतींमध्ये मोजकेच लोक उमेदवार कसा निश्‍चित करू शकतात, असा प्रश्‍न पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आहे. पक्षाची निष्ठा, सातत्य, लोकांशी असलेला संपर्क यांचा विचार हवा. यापूर्वी ज्यांना पक्षाने खूप काही दिले आणि ज्यांनी निवडणुकांत सपाटून मार खाल्ला, अशांचा लोकसभा निवडणुकीसाठी कसा विचार होतो, असे मतही त्यांनी “सकाळ’कडे व्यक्त केले.

News Item ID: 
51-news_story-1541869452
Mobile Device Headline: 
लोकसभेसाठी काँग्रेसकडून पाच जण इच्छुक 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Five people wanting for the Lok Sabha from the Congress
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, लोकसभा, राष्ट्रवाद, अशोक चव्हाण, Ashok Chavan, मुंबई, Mumbai, निवडणूक, आमदार, अनंत गाडगीळ, Anant Gadgil
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2AXIzKj

Advertisements

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.